डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड Saam Tv
महाराष्ट्र

डोंबिवलीत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात जणांनी तोडफोड केल्याची घटना काल घडलीये.

प्रदीप भणगे

ठाणे : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात जणांनी तोडफोड केल्याची घटना काल घडलीये. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रदेश सचिव संतोष केणे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, सोमवारी संध्याकाळी याच विषयावरुन काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. काँग्रेस पक्षाला या कार्यालयाचा वापर करता येऊ नये, या उद्देशातून राजकीय पाठिंबा असलेल्या विकासकांनी कार्यालयाची तोडफोड करुन त्यातील कागद पत्रे गहाळ केली, असावी अशी शंका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी उपस्थित केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अन्यथा आंदोलन करु असा इशारा संतोष केणे यांनी दिला. 

हेही वाचा -

डोंबिवली पूर्वेतील पाटकर रोडवरील विश्वदीप सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. 50 वर्षांहून अधिक जुने हे कार्यालय असून सदरची बिल्डिंगही जुनी झाली आहे. 25 ऑक्टोबरपासून कार्यालय बंद होते. रविवारी सकाळी जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानबा पौळकर हे कार्यालयात गेले, असता त्यांना जिन्याचा काही भाग तुटलेला आढळून आला.

त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता आतील सामान देखील अस्ताव्यस्त करुन तोडफोड केली असल्याचे दिसले. तसेच छताचा स्लॅब देखील तुटून पडला होता. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. माहिती समजताच काँग्रेसचे प्रदेश नेते संतोष केणे, नवेंदू पाठारे, अशोक कापडणे, संजय पाटील, एकनाथ म्हात्रे हे घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी बोलताना संतोष केणे यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला. तर पोटे म्हणाले की, 52 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे आहे. पक्षाचे कार्यालय एका रात्रीत या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.

कागदपत्र चोरीला गेली आहेत. याचा अर्थ असा होतो, की ही इमारत पुनर्बांधणीसाठी गेल्यास काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येऊ हाच दिसतो. यामागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे होणार नाही. स्थानिक आमदारांच्या पाठिंब्याने ही तोडफोड झाली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी लवकरात लवकर यामागे नक्की कोण आहे हे शोधून काढावे. जागा मालक वाघडकर यांनी आम्हाला असे लेखी लिहून द्यावे, की या इमारतीचा पुनर्विकास झाला तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईल.

जोपर्यंत ही इमारत होऊ देणार नाही असा एक मताने निर्णय काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतला असल्याचे पोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, संतोष केणे, एकनाथ म्हात्रे, रवी पाटील, शरद भोईर, पमेश म्हात्रे, राहुल केणे, प्रणव केणे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT