Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Dombivili News : लटकलेल्या वायरच्या शॉक लागून पाच म्हशींचा जागीच मृत्यू

Dombivli News : लटकलेल्या वायरच्या शॉक लागून पाच म्हशींचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात महावितरणच्या गलथान कारभारामुळे (Mahavitaran) आज सकाळी (Dombivili) पाच म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

भोपर गावातील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या महावितरणच्या पोलवरील वायर तुटून लटकलेल्या अवस्थेत होती. या वायर बाबत अनेकदा ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळेच आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या (Electric Shock) सुमारास ग्रामस्थ शिवाजी पाटील यांच्या पाच म्हशी या रस्त्यावरून जात असताना या वायरीचा स्पर्श म्हशींना झाला त्यामुळे या पाचही म्हशींना शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे म्हैस पालक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात संतापाचं वातावरण पसरलं आहे .ग्रामस्थांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचेही निधन

साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप, उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थन

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

SCROLL FOR NEXT