Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: अनधिकृत वीज जोडणी; कारवाई करायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर दगडफेक करत मारहाण

अनधिकृत वीज जोडणी; कारवाई करायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर दगडफेक करत मारहाण

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

डोंबिवली : बेकायदेशीर वीज जोडण्या व वीज चोरी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या (Mahavitaran) भरारी पथकावर जमावाकडून हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवली (Dombivali) जवळील खोनी गावात आज दुपारच्या सुमारास घडली. यात जमावाने गाडीच्‍या काचा फोडून लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. (Breaking Marathi News)

महावितरणच्या भरारी पथकामधील अभियंत्यांसह, कर्मचारी, पोलीस कर्मचारी कारवाईसाठी गेले हेाते. परंतु, जमावाने लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारहाण केली. भरारी पथकाच्या गाडीचे देखील या जमावाने तोडफोड केली. हा जमाव इथेच थांबला नाही तर भरारी पथकाच्या ताब्यात असलेले मीटर देखील या जमावाने हिसकावून नेले. या प्रकरणी मानपाडा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीये.

डोंबिवली जवळील ग्रामीण भागात सुरू असलेल्या वीज चोरीबाबत महावितरणची (MSEDCL) कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर विज जोडण्या, मीटरमध्ये फेरफार करत वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. महावितरणचे भरारी पथक आज डोंबिवली ग्रामीण भागातील खोनी गावात कारवाई करण्यासाठी गेले. एका बंगल्यातील वीज मीटरवर कारवाई सुरू असतानाच अचानक काहीजण आले व त्यांनी या पथकाचे हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

काही क्षणात या जमावाने भरारी पथकामधील कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडके व दगडांनी मारहाण केली. भरारी पथकावर दगडफेक केली. पोलीस कर्मचाऱ्याला देखील या जमावाने मारहाण केली. भरारी पथकाच्या गाडीची देखील या जमावाने तोडफोड केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात महावितरणचे अधिकाऱ्यांनी तक्रार दिली असून या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT