Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali : शिंदे शिवसेना- ठाकरे गट आमनेसामने; डोंबिवलीतील उद्यानात होणाऱ्या वाचनालयावरुन वाद

Dombivali News : डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यान आहे. या उद्यानात लहान मुले, महिला, वयोवृद्ध येतात. तर याच उद्यानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून वाचनालय तयार होणार आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डाेंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यानात तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे. या उद्यानात होत असलेल्या वाचनालयास शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. यामुळे दोन्ही गट आमने सामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. 

डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यान आहे. या उद्यानात लहान मुले, महिला, वयोवृद्ध येतात. तर याच उद्यानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरीकांसह शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे. 

तर होणारी वस्तू तोडण्याचा इशारा 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अभिजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, हे उद्यान लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे उद्यान लहान होईल. उद्यानाचा काही फायदा होणार नाही. त्याठीकाणी तयार करण्यात आलेली वास्तू तोडण्यात येईल. या गार्डनला आम्ही विरोध केला आहे. हे गार्डन आम्ही होऊ देणार नाही. अशी भूमिका काही नागरीकांनी देखील घेतली आहे. 

पोटात दुखत असल्याने विरोधाची भूमिका 

तर या बाबत शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी सांगितले, कि नागरीकांना विचारुन हा प्रस्ताव केला आहे. २५ लाखातून सुसज्ज असे उद्यान तयार होणार आहे. त्यात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा असणार आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे, त्यामुळे ते विरोधाची भूमिका घेत आहे. गार्डनच्या परिसरात अनधिकृत बॅनर बाजी सुरु आहे. त्यावर का बोलत नाही. होणारे वाचनालय अधिकृत असून ते होणारच. आत्ता या मुद्यावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपल्याने राजकारण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT