Dombivali MIDC Saam tv
महाराष्ट्र

Dombivali MIDC: डोंबिवली एमआयडीसी प्रशासनाचा निषेध; नागरिकांची रस्त्यांसाठी मुक निदर्शने

Dombivali News : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तीस वर्षानंतर रस्त्यांचे काँक्रीटकरण होणार ही चांगली बाब

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. मात्र यामधील मॉडेल कॉलेजसह (Dombivali) काही परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आज नागरिकांनी हातात निषेधाचे फलक व तोंडाला मास्क लावून या परिसरातील रस्त्यांवर एमआयडीसी विरोधात मूक निदर्शने केली. (Maharashtra News)

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तीस वर्षानंतर रस्त्यांचे काँक्रीटकरण होणार ही चांगली बाब आहे. प्रत्यक्षात मात्र एमआयडीसीतील महत्त्वाच्या मॉडेल कॉलेज परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार नसल्याचा आरोप केलाय. काही अंतर्गत रस्ते महत्त्वाचे नसतानाही व त्यावर जास्त रहदारी नसतानाही त्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मग मॉडेल कॉलेज अंतर्गत रस्त्यांसह शिवाई बालक मंदिर शाळेसमोरील रस्ता व चैतन्यनगर, मिलापनगर, सुदर्शननगरमधील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण का करणार नाही? असा सवाल देखील नागरिकांनी केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टॅक्स भरतो रस्ता हवाच 

रास्ता काँक्रिटीकरणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी तोंडाला मास्क बांधून निदर्शने केली. यावेळी एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करत आम्ही टॅक्स भरतोय तरीही आमच्यावर अन्याय का? या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालच पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT