Manpada Police Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात; मानपाडा पोलिसांची कारवाई

Dombivali News : डोंबिवली शहरांमध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण- डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल खिशात ठेवून फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना  दिसत आहे. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तूल व ६ काडतुसांसह एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

डोंबिवली शहरांमध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस (Manpada Police) स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले. या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुस आणि दोन मोबाईल आढळून आले. (Dombivali) यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

अंकुश राजकुमार केशरवानी असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात त्याने हे पिस्तूल कोणत्या कारणाने आणलं होतं याचा तपास पोलीस करत आहेत 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT