Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: घरात जातानाच झाला घात; विजेच्या खांबाला शॉक लागून इसमाचा मृत्यू

घरात जातानाच झाला घात; विजेच्या खांबाला शॉक लागून इसमाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

डोंबिवली : घराजवळ असलेल्या विजेच्या खांबाचा शॉक लागून (Electric Shock) एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली (Dombivili) कोपर रोड सिद्धार्थनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. मांगीलाल मोरे असं मयत इसमाचे नाव आहे. (Maharashtra News)

डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड सिद्धार्थनगर परिसरात मांगीलाल मोरे हे आपल्या कुटुंबासह राहतात. मांगीलाल हे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्‍यान मंगळवारी (१३ जून) रात्रीच्या सुमारास ते आपल्या घरात जात असताना घराशेजारी असलेल्या विजेच्या खांब्याचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थनगर परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या खांब्यावरून विजेच्या वाहिन्या लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र महावितरण दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला.

नागरीकांचा रास्‍ता रोको

मांगीलाल मोरे यांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच संतापाची लाट पसरली. आज दुपारच्या सुमारास सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी रस्ता रोको करत (Mahavitaran) महावितरण व महापालिकेच्या या कारभाराचा निषेध नोंदवला. मांगीलाल मोरे यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अशी मागणी यावेळी मोर्चाकऱ्यानी केली. याबाबत महावितरण व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. याबाबत बोलताना महावितरणचे अधिकारी इमरान शेख यांनी विद्युत निरीक्षकाचा अहवाल आल्यानंतर दोशींवर कारवाई तसेच नुकसान भरपाई याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT