Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: तरुणासोबत चॅटिंग केल्याने पतीसोबत वाद; विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

तरुणासोबत चॅटिंग केल्याने पतीसोबत वाद; विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

डोंबिवली : रक्षाबंधनानिमित्ताने पतीसोबत नणंदकडे गेलेल्या पूजा साळुंके या विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी डोंबिवली (Dombivali) पूर्वेत घडली होती. मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून इंस्टाग्रामवर तरुणासोबत चॅटिंग केली. हि बाब पतीला माहित झाल्याने पतीसोबत वाद झाला. यातूनच पूजा हिने आत्महत्या केली. या प्रकरणी (Police) पोलिसांनी पतीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) येथे राहणाऱ्या पूजा सोळुंके हि रक्षाबंधनासाठी डोंबिवलीला पतीसोबत नंदेकडे आली होती. दोन दिवसांपूर्वी  इमारतीवरून उडी मारून पूजा साळुंके हिने आत्महत्या केली. पूजा हिने आत्महत्या केल्याचे कारण समजले नव्हते. मात्र मानपाडा पोलिसांनी एडिआर दाखल करत तपास सुरू केला असता पतीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. परंतु अधिक तपस केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे.

पतीसह तरुणावर गुन्हा दखल 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा आणि गोपाल शिंदे नामक तरुण इंस्टाग्रामवर सातत्याने चॅटिंग करत होते. घटनेच्या दिवशी देखील पूजा हि तरुणासोबत चॅटिंग करत होत. यावेळी पती करण याने हे पाहिले. यामुळे दोघांमध्ये वाद झाला; या वादामुळे पूजाने आत्महत्या केली. दरम्यान पूजाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पूजा सोळुंके आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पूजाचे पती करण सोळके आणि गोपाल शिंदे यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे याबाबत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी पती करण याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT