Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : जागेच्या वादातून टोळीकडून दुकानांची तोडफोड; घटना सीसीटिव्हीत कैद

Dombivali News : डोंबिवलीच्या पश्चिम कुंभारखान पद परिसरात प्रशांत पाटील यांच्या मालकीचे काही दुकाने गेल्या ४० वर्षांपासून आहे प्रशांत पाटील यांच्या दुकानाला लागून एका मोठ्या विकासकाच्या इमारतीचे काम सुरू आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा परिसरात असलेल्या दुकानांच्या बाजूला असलेल्या जागेवर होत असलेल्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. या वादातून रात्रीच्या वेळेस दहा ते बारा जणांच्या टोळीने दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान दगडफेक व तोडफोड करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

डोंबिवलीच्या पश्चिम कुंभारखान पद परिसरात प्रशांत पाटील यांच्या मालकीचे काही दुकाने गेल्या ४० वर्षांपासून या भागात आहे. तर प्रशांत पाटील यांनी त्यांच्या दुकानाला लागून असलेल्या जागेवर एका मोठ्या विकासकाच्या इमारतीचे काम सुरू आहे. दरम्यान प्रशांत पाटील यांच्या दुकानामुळे विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणाने ४ जानेवारीच्या रात्री काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्यांच्या जागेत तोडफोड आणि दगडफेक केल्याचा आरोप प्रशांत पाटील यांनी केला आहे. 

पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप 

दरम्यान प्रशांत पाटील यांनी याप्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची तक्रार स्वीकारली नसल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला असून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

जागेवरून होत असलेल्या वादात ४ जानेवारीच्या रात्री गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्यांच्या जागेत तोडफोड आणि दगडफेक केल्याचा आरोप प्रशांत पाटील यांच्या कडून करण्यात आला आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहादा समाज कल्याण वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट; आधी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावणार ट्रेन, कधी होणार लोकार्पण?

Diabetes and Tamarind: रक्तातील साखर कमी करण्यासाठी चिंचेच्या बिया उपयोगी? डॉक्टरांचा मोठा खुलासा

भाजपच्या दिग्गज नेत्याच्या एकुलत्या एक मुलाचे भुसावळमध्ये अपघाती निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

SCROLL FOR NEXT