Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : डोंबिवली स्टेशन परिसरात दहा दुकानांमधून लाखोंचा मुद्देमाल लंपास; पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरची घटना

Dombivali News : डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात असलेली सात दुकाने तर पश्चिमेकडील दोन दुकाने फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यापाऱ्यांनी सुरक्षा डोअर आणि शटर लॉक लावले असताना चोरी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
डोंबिवली
: रेल्वे स्टेशन परिसरात लहान- मोठ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. अशाच प्रकारे डोंबिवली स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास दुकांनामध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. काल रात्रीच्या सुमारास स्टेशन परिसरात असलेले नऊ ते दहा दुकाने अज्ञात चोरट्यानी फोडली आहेत. या दुकानांमधून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे समोर आले आहे. 

रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी देखील वर्दळ पाहण्यास मिळत असते. अशा परिस्थिती देखील चोरट्यानी दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात असलेली सात दुकाने तर पश्चिमेकडील दोन दुकाने फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यापाऱ्यांनी सुरक्षा डोअर आणि शटर लॉक लावले असताना चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन 

डोंबिवली स्टेशन परिसरातील सात दुकाने फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. यात तीन चोरटे मध्यरात्री दुकानांचे शटर उघडून चोरी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दुकानांमध्ये चोरी झाली. त्या ठिकाणापासून डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरी देखील चोरट्यांनी हात साफ केला. 

सुरक्षिततेचा प्रश्न 

हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशनजवळ असतानाही चोरीची घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाणे व विश्वनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू आहे. तर स्टेशन परिसरात पोलीस स्टेशन जवळील परिसरात चोरी करून चोरट्याने पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांकडून चोरट्यांचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: वारंवार लघवीला जाताय, तहान-भूक वाढलीये? डायबेटीजच्या सुरुवातीच्या ४ लक्षणाकडे दुर्लक्षित करु नका, अन्यथा...

Maharashtra News Live Update: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी लागली कामाला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार?

Oily Skin Face Wash Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणता फेसवॉश बेस्ट? जाणून घ्या

Petrol Diesel Price: मोठी बातमी! युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT