Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

Theft News Dombivali: पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार चोरटे सुनीलनगर डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी या तीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 
डोंबिवली
: डोंबिवली पूर्व विभागात पायी चालत जाणाऱ्या वृध्द महिलेच्या गळ्यातील चैन मोटारसायकलवर जाणाऱ्या चोरट्यांनी खेचून पोबारा केला होता. या गुन्ह्याची नोंद रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याचा तपास पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे करून तीन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांनी चौकशी केली असता त्यांनी पुण्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.  

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील चैन तोडून चोरटे पसार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता अभय गुप्ता, अभिषेक जौहरी व प्रशांत शुक्ला या तिघांना चैन स्नॅचिंग प्रकरणी ताब्यात घेतले आहे. दरम्यान हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत समोर आले आहे. 

अगोदर पुण्यातून चोरली दुचाकी 

दरम्यान या तिघांनी पुण्यातून बाइक चोरी करून आणली होती. यानंतर त्यांनी डोंबिवलीत चैन स्नॅचिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार हे चोरटे सुनीलनगर डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी या तीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून ३ लाख ८० हजार ४२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. 

उत्तरप्रदेशात हत्येचा गुन्हा 

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून यातील एक आरोपी प्रशांत शुक्ला याच्यावर उत्तरप्रदेश येथे हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याच प्रमाणे अभिषेक जौहरी याच्यावरही उत्तर प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आणखी तपास सुरु असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT