Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: भंडाऱ्यात पावसासाठी लावलं बाहुला-बाहुलीचं लग्न, अनोख्या परंपरेमागचे रहस्य काय?

Bhandara News: पावसाला आमंत्रण देण्यासाठी लाखांदूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये चक्क बाहुला बाहुलीचं लग्न लावण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

शुभम देशमुख

Bhandara News: मांडव सजला, बँडबाजासह वऱ्हाडी आले, लग्न घटी समीप आली आणि भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात गावकऱ्यांची लगीन घाई सुरु झाली. हा लग्न सोहळा खास असल्याने या सोहळ्याला खास पाहुण्याला आमंत्रित करण्यात आलं. हा पाहुणा आहे वरुण राजा. पावसाला आमंत्रण देण्यासाठी लाखांदूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये चक्क बाहुला बाहुलीचं लग्न लावण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पावसाला आमंत्रण देण्यासाठी लाखांदूर येथे चक्क बाहुला बाहुलीच लग्न लागलं. वरूण राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून बाहुला बाहुलीचा स्वयंवर आयोजित करण्यात आला.

लग्न मंडप हिरव्यागार झाडांच्या फांद्यांनी सजला. सायंकाळ झाली अन् नवरदेव रुपी बाहुला लग्न मंडपात येण्यासाठी जानावशावरून निघाला. नवरदेव रुपी बाहुल्यासोबत एक दोन नव्हे चक्क १०० हून अधिक वऱ्हाडी वरातीत सामील झाले.

वरातीत वऱ्हाडी बेधुंद नाचू लागले. वाजत गाजत वरात लग्न मंडपात पोहचली. तर बाहुली नटून थटून नवरीच्या रुपात मंडपात आसनस्थ झाली. चक्क पाच मंगलाष्टके झाले आणि बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला.नंतर वऱ्हाड्यांसाठी स्वादिष्ट जीवांची सोय केली होती. त्यावर पाहुण्यांनी ताव मारला.

भंडाऱ्यात पावसाने हजेरी जरी लावली असली तरी लाखांदूर तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता लाखांदूर वासीयांनी बाहुला बाहुलीचे लग्न लावून वरूण राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार पाऊस पडून बळीराजा सुखावला पाहिजे, अशी विनवणी केली. आता वरुण राजा बरसणार की काय याकडे लक्ष लागले आहे. असे जरी असले तरी तूर्तास गोष्ट बाहुला बाहुली च्या लग्नाचीच सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बजेटला लागली कात्री

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

SCROLL FOR NEXT