Doctor Apurva Pravinchandra Hendre saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! महिला डॉक्टरने मित्र-मैत्रिणींसोबत रात्री केली पार्टी, इंजेक्शनचा घेतला ओव्हरडोस, त्यानंतर...

कोल्हापूरच्या ताराबाई पार्कमधील एका मॉल जवळ महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या एका तरुणीनं इंजेक्शनचा ओव्हरडोस (injection overdose) घेऊन आत्महत्या केली आहे. ताराबाई पार्कमधील एका मॉल जवळ या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. अपूर्वा प्रविणचंद्र हेंद्रे (३०) असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेची कोल्हापूरच्या शाहपुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या (doctor end life) घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपूर्वा हेंद्रे कसबा बावडा येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. अपूर्वा शनिवारी तिच्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर मध्यारात्री पार्टी संपल्यानंतर त्या घरी परतल्या. पण त्यानंतर कुटुंबीयांना न सांगताच अपूर्वा घराबाहेर पडली.

त्यानंतर अपूर्वाच्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली पण त्यांना अपूर्वा सापडली नाही. त्यानंतर त्यांनी शहापुरी पोलीस स्टेशनला जाऊन अपूर्वा बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी अपूर्वाचा शोध सुरु केला. त्यावेळी घराजवळच असणाऱ्या मॉल शेजारी अपूर्वा बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर अपूर्वाला रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अपूर्वाला मृत घोषीत केले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT