Dnyaneshwari Shinde Saam Tv
महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीने लंडनमध्ये केली कमाल ! राष्ट्रकुलमध्ये तलवारबाजी सांघिक गटात पटकावले रौप्यपदक

लातूरच्या ज्ञानेश्वरी शिंदेने लंडनमध्ये राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत ज्युनिअर गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर: लातूरच्या (Latur) ज्ञानेश्वरी शिंदेने लंडनमध्ये राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत ज्युनिअर गटात रौप्यपदकावर आपले नाव कोरले आहे. हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ज्ञानेश्वरी माधव शिंदेने इप्पी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत लंडन येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत छाप सोडली आहे. तिची सलग ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून, या स्पर्धेत तिने आपले कौशल्य पणाला लावून भारताला हे यश मिळवून दिले आहे.

लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत संघाने अनेक देशांचा पराभव केला. पहिल्या आठ देशांच्या झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४५-४० असा पराभव केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ५ गुणांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मात्र यजमान इंग्लंड संघाकडून भारताला ४५-२५ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तिला प्रशिक्षक वजिरोद्दीन काझी, मोहसीन शेख, आकाश बनसोडे, बबलू पठाण, रोहित गलाले यांचे मार्गदर्शन लाभले.

राष्ट्रकुल स्पर्धेत केंद्राच्या क्रीडा विभागाने केवळ पाच खेळाडूंचा खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. यामुळे ज्ञानेश्वरीचे राष्ट्रकुल स्पर्धेचे स्वप्न भंगते की काय, असे वाटत होते. मात्र, लातूरच्या क्रीडा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक लाखाचा निधी तिला उपलब्ध करून दिला. यासह जिल्हा संघटनेनेही तिला ६१ हजारांची मदत केली.

नांदेडच्या (Nanded) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिचा मार्ग सुकर झाला होता. त्यातच तिने आता पदक जिंकल्याने ही मदत सार्थ ठरली. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याचा आनंद आहे. भविष्यात कामगिरीत आणखीन सुधारणा करून ऑलिम्पिक खेळण्याचे ध्येय असल्याचं ज्ञानेश्वरी शिंदे हीने मत व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT