शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संपत्तीवरून वाद दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या संपत्तीवरून वाद

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतरही प्रॉपर्टी आणि समाधी स्थळावरून वाद निर्माण झाला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतरही प्रॉपर्टी आणि समाधी स्थळावरून वाद निर्माण झाला आहे. मठाची प्रॉपर्टी आणि समाधी स्थळाची पेटी हलवून महाराजांचे काही नातेवाईक आणि कार्यकारणीतले काही जण दुकानदारी सुरु करीत असल्याचा आरोप शिवा लिंगायत युवक संघटनेने केला आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे समाधी स्थळावर पोलीस पहारा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या शेवटच्या सहा महिन्यांच्या जीवन प्रवासाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी ही संघटनेने केली आहे. या मागणीसाठी लातूरच्या महात्मा गांधी चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शासकीय इतमामात महाराजांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अशा पद्धतीने समाधीसाठी दुकानदारी करण्याचा प्रयत्न लिंगायत समाज हाणून पाडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. गेल्यावर्षी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मृत्यूपूर्वी लातूर आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी यांनी इन कॅमेरा केलेली व्हिडिओ सीडी सार्वत्रिक करावी. जेणेकरून महाराजांचा उत्तराधिकारी कोण आहे हे ही सर्वांसमोर येईल असेही मत यावेळी आंदोलकांनी नोंदविले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT