omraje nimbalkar, ranajagjitsinha patil saam tv
महाराष्ट्र

Video : तू तुझ्या औकातित राहा ! ठाकरे गटाच्या खासदाराचा चढला पारा, भाजप आमदाराला दमबाजी; जिल्हाधिकारी अवाक

हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या समोर घडत होतं.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

तु तूझ्या औकातित राहा असा दम खासदार ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) यांनी आज आमदार राणा राणाजगजितसिंह पाटील (ranajagjitsinha patil) यांना देत जास्त बोलू नकोस, तुमचे संस्कार मला माहित आहेत असेही म्हटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या बैठकीत सर्वच अवाक झाले.

उस्मानाबाद (osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचे पाहायला मिळाली. पाटील आणि निंबाळकर यांचे राजकीय हाडवैर पुन्हा एकदा जनतेच्या समाेर आले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज पीकविमा संदर्भात बैठक हाेती. ही बैठक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दरम्यान भाजपा आमदार राणाजगजिसिंह पाटील हे इथे हजर होते.

काही वेळानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे पोहचले आणि मला बैठकीचा निरोप का दिला नाही असा जाब जिल्हाधिकारी यांना विचारला. यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी बोलायला सुरुवात केली. यावेळी खासदारांचा पारा चढला. ते आमदार पाटलांना म्हणाले तु तूझ्या औकातित राहा. जास्त बोलू नकोस असा दम भरला. हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांच्या समोर घडला. जिल्हाधिका-यांनी वाद वाढू नये यासाठी मध्यस्थी देखील केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT