DISHA SALIAN FIR saam tv
महाराष्ट्र

डिलिमिटेशसाठी ठाकरेंविरोधात FIRचा कट, सह्याद्री अतिथीगृहावर ठरली FIRची स्क्रिप्ट, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राऊतांचा मोठा आरोप

Aaditya Thackeray Named In FIR: दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील FIRमध्ये ठाकरेंचं नाव आल्यानंतर आता नवंनवे आरोप समोर येतायत. तीन कारणांमुळे ठाकरेंविरोधात हा कट करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. कोणती आहेत ही तीन कारणं ? त्याला मुख्यमंत्र्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय ? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं FIRमध्ये नाव आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली..अ्शातच ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी तीन मुद्द्यांमुळे सरकार ठाकरेंवर दबाब आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केलाय... तसचं डिलिमिटेशनला पाठींबा देण्यासाठी हा कट रचला जातोय, असा दावाही राऊतांनी केलाय.

दरम्यान दिशा सालियन प्रकरणातील FIR ची स्क्रीप्ट सह्याद्री अतिथीगृहावर दोन नेत्यांच्या भेटीत लिहिली गेल्याचा आरोप करत राऊतांनी अमित शाह आणि एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबात आदित्य ठाकरेंसह थेट उद्धव ठाकरेंपासून अनिल देशमुखांपर्यंत सर्वांचा करण्यात आलेला उल्लेख पाहता या प्रकरणाला राजकीय वळण मिळणार हे स्पष्ट आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयनं दिल्लीत नोदवलेल्या या FIRमध्ये आरोपींचा रकाना मोकळा ठेवल्यानं गूढ वाढलं असून भविष्यात हे प्रकरण कोणतं वळण घेतं याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे ठिय्या आंदोलन

Flight Glitch : ३७,००० फुटांवर तांत्रिक बिघाड;  ९ मिनिटांत २८,००० फूट खाली आले विमान,  'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

SCROLL FOR NEXT