माणुसकीला काळिमा! नवजात बाळास पित्यानेच विकल्याचा धक्कादायक प्रकार SaamTVNews
महाराष्ट्र

माणुसकीला काळिमा! नवजात बाळास पित्यानेच विकल्याचा धक्कादायक प्रकार

पित्यासह एका मध्यस्थी महिलेस नागपूर पोलिसांकडून अटक

मंगेश मोहिते

नागपूर : नागपुरात एका नवजात बाळाला पित्यानेच विकल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पाचपावली (Pachpavli) पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पिता उत्कर्ष दहिवले आणि मध्यस्थ महिला उषा सहारे हे या प्रकरणातील आरोपी आहेत. नागपूरच्या (Nagpur) पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील राणी दुर्गवती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेले एक दाम्पत्य राहत होते. दोघेही मोलमजुरी करत होते.

हे देखील पहा :

मात्र, पती उत्कर्ष हा दारुडा होता. नुकतीच त्याला मुलगी झाली. मात्र, त्याच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली आणि तिने त्याला पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. उषा सहारे खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेड मधील एका गरजू दांपत्याला पकडले आणि त्यांना तिने नेमके काय सांगितले हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, उत्कर्ष याला 70 हजार रुपये देण्याचं ठरलं आणि त्याने आपल्या नवजात बाळाला विकलं. मात्र, बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली.

पोलिसांनी (Police) बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केली असून आता यात हे बाळ विकत घेणाऱ्यांचा नेमका उद्देश काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मध्यस्थी करणाऱ्या महिलेने बाळ (Baby) विकत घेणाऱ्या घेणाऱ्या दांपत्याला काही वेगळीच माहिती दिली असावी असा अंदाज आहे. त्यांना बाळ नसल्याने त्यांनी उषा सहारेच्या बोलण्यात येऊन पैसे दिले. तर, त्या बाळाचा बाप मात्र दारुडा असल्याने त्याने हे कृत्य पैश्यासाठी केलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

SCROLL FOR NEXT