Dilip Valse Patil Saam Tv
महाराष्ट्र

Dilip Valse Patil: नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती स्थापन करणार : दिलीप वळसे-पाटील

Dilip Valse Patil: नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती स्थापन करणार : दिलीप वळसे-पाटील

Bharat Jadhav

नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी-सेवा उपलब्ध करून देतात. परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत. या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठित करावी, असे निर्देश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेत. मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत वळसे पाटील बोलत होते. (Latest News)

यावेळी बोलताना वळसे- पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत गठित समितीने अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल.

बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Tone Fashion Tips: फेअर, गव्हाळ की डस्की? स्किन टोननुसार कपड्यांचा रंग निवडण्याच्या ७ खास टिप्स

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT