Dhule Zilha Parishad Saam tv
महाराष्ट्र

धुळे जिल्हा परिषदेला मिळाल्‍या आयटी इंजिनिअर अध्यक्ष

धुळे जिल्हा परिषदेला मिळाल्‍या आयटी इंजिनिअर अध्यक्ष

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्‍या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रीयेत जिल्‍हा परिषदेवर भाजपने पुन्‍हा सत्‍ता काबीज केली असून यात अध्‍यक्ष पदी अश्विनी पाटील तर उपाध्‍यक्ष पदी देवेंद्र पाटील यांची निवड झाली आहे. (Breaking Marathi News)

धुळे जिल्‍हा परिषदेत मागील अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी ही निवड प्रक्रिया झाली. जिल्ह्यातील चारही तालुक्यांमधील भाजपच्या सर्वच नेत्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पूर्णतः ताकद लावली होती. धुळे जिल्हा परिषदेच्या गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात 34 अध्यक्ष झाले असून आत्तापर्यंत चार महिलांनी अध्यक्ष पद भूषवले आहे. यंदा पाचव्या महिला अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अश्विनी पाटील यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी देवेंद्र पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर महाविकास आघाडी कडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

कोण आहेत अश्विनी पाटील

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेल्या अश्विनी पाटील ह्या गेल्या साठ वर्षांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळातील सर्वात तरुण अध्यक्ष असून आयटी इंजिनिअर असलेल्या अश्विनी पाटील या भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव यांच्या सुन आहेत. धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद धुळे तालुक्याच्या वाटेला गेल्याने तालुक्यातील भाजपची ताकद अधिक वाढणार असून याचा परिणाम आगामी काळातल्या निवडणुकांवर होतो का हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT