Dhule News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : पतंग उडवण्याचा मोह महागात पडला! ६ वीतील विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Dhule Tragedy News : धुळे येथील कापडणे परिसरात पतंग उडवताना ६वीतील विद्यार्थीचा तीन मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • धुळ्यात पतंग उडवत असताना ६वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

  • बांधकामाधीन तीन मजली इमारतीवरून पाय घसरून मुलगा खाली पडला

  • इमारतीवर सुरक्षेची कोणतीही साधने नसल्याने अपघात घडल्याची चर्चा

  • घटनेनंतर परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे

काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून शहरात नागरिक पतंग उडवण्याची मज्जा घेत आहेत. अशातच धुळ्याच्या कापडण्यामध्ये पतंग उडवताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पतंग उडवत असताना शाळकरी विद्यार्थ्याचा तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रक्षित प्रभाकर पाटील ( Rakshit Patil ) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रक्षित हा इयत्ता ६वीमध्ये शिकत होता. घटनेच्या दिवशी रक्षित शाळेत जायला निघाला होता. यादरम्यान वाटेत त्याला आपले मित्र पतंग उडवत असल्याचे दिसले आणि त्याला पतंग उडवण्याचा मोह अनावर झाला.

रक्षित पतंग उडवण्यासाठी इमारतीवर गेला असता त्याचा पाय घसरला. पाय घसरल्याने रक्षित खाली कोसळला. आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या इमारतीचे काम सुरू असून मजूर कामावरती आलेले नसताना ही घटना घडली. रक्षितच्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT