Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : व्याजाने दिलेले पैसे वसूल केल्यानंतरही जमीन केली नावावर; अवैध सावकारी करणाऱ्यास घेतले ताब्यात

Dhule News : शिरपूर येथील सावकाराने तक्रारदाराला २०१७ मध्ये तीस लाख रुपये पाच टक्के व्याजदराने दिले होते. आतापर्यंत या अवैध सावकाराने संबंधिताकडून जवळपास एक कोटी ३७ लाख रुपये देखील वसूल केले

भूषण अहिरे

धुळे : पाच टक्के व्याजाने दिलेली रक्कम व्याजासकट वसूल केली. तरीदेखील संबंधितांची शेत जमीन आपल्या नावावर करून घेतली. या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराला ताब्यात घेतले आहे. त्या विरोधामध्ये अवैध सावकारी करत तक्रारदाराची जमीन लाटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरपूर (Shirpur) येथील सावकाराने तक्रारदाराला २०१७ मध्ये तीस लाख रुपये पाच टक्के व्याजदराने दिले होते. आतापर्यंत या अवैध सावकाराने संबंधिताकडून जवळपास एक कोटी ३७ लाख रुपये देखील वसूल केले आहेत. तरी देखील वाढलेल्या व्याजाच्या पोटी अवैध सावकाराने संबंधिताची जमीन देखील आपल्या नावे करून घेतल्याची तक्रार दाखल झालेली होती. याबाबत आता आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने (Dhule LCB) पुढील तपास करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या अवैध सावकारी विरोधात कारवाईनंतर अवैध सावकारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

याशिवाय आणखी तीन जणांनी देखील या संबंधित सावकारा विरोधामध्ये तक्रार दाखल केली असून या चार तक्रारींचा विचार करता आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने या अवैध सावकारावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत या सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी (Police) त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने या सावकाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT