Shirpur News Soldier Death Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : भारतीय सैन्य दलाचे लान्सनायक मनोज माळींना वीरमरण

भारतीय सैन्य दलाचे लान्सनायक मनोज माळींना वीरमरण

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : वाघाडी (ता. शिरपूर) येथील रहिवासी तथा भारतीय सैन्य दलाचे लान्सनायक मनोज संजय माळी (वय २५) यांना सिक्कीम येथे कर्तव्य (Soldier Death) बजावत वीरमरण आले. (Shirpur News) बुधवारी (५ जुलै) सायंकाळी त्‍यांचा अपघात होवून वीरमरण प्राप्त झाले. (Maharashtra News)

सिक्कीम येथे डोंगराळ भागात कर्तव्य बजावत असताना पाय घसरुन मनोज माळी सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. तेथून मृतदेह वाघाडी येथे आणला जाणार असून सैन्यदलासह शासकीय इतमामाम त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चार वर्षापुर्वी सैन्‍यदलात भरती

चार वर्षापूर्वी मनोज माळी हे सैन्यदलात सेवेसाठी रुजू झाले होते. त्यापूर्वी येथील एसपीडीएम महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेचे सिनिअरअंडर ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. अत्यंत सामान्य कुटुंबातील मनोज माळी यांनी बालपणापासून सैन्यदलात नोकरीचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी वाघाडी येथील संजय माळी यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. मनोज माळी यांच्यामागे वडील, भाऊ आणि आई असे कुटुंब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT