Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : अंगावर वीज पडल्याने बालकाचा मृत्यू; बैलांना धरणावर नेले असतानाची घटना

Shirpur News : शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा शिवारात असलेल्या धरणात २२ एप्रिलला बैलांना पाणी पाजण्यासाठी युवराज घेऊन गेला होता.

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाले असताना बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बालकाच्या अंगावर (Lightning Strike) वीज पडून त्याचा मृत्यु झाल्याची घटना (Shirpur) शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा येथे घडली. युवराज कैलास पावरा (वय ११) असे मृताचे नाव आहे. (Live Marathi News)

शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा शिवारात असलेल्या धरणात २२ एप्रिलला बैलांना पाणी पाजण्यासाठी युवराज घेऊन गेला होता. या दरम्यान सकाळी अकराला त्याच्या अंगावर वीज कोसळली असता त्याचा यात जागीच मृत्यू झाला. (Dhule) यावेळी धरणालगत शेतात काम करणाऱ्या विक्रम लालचंद पावरा याने हा प्रकार पाहिला. त्याने माहिती दिल्यानंतर, युवराजचे कुटुंब घटनास्थळी पोहोचले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटुंबीयांचा आक्रोश 

यानंतर तातडीने युवराजला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी युवराजच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. सांगवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

SCROLL FOR NEXT