Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : उपमुख्यमंत्री फडणवीसांना कोळी समाजाने दाखविले काळे झेंडे; १० वर्षानंतरही आश्वासन पूर्तता न केल्याने केला निषेध

Dhule News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आपले सरकार आल्यावर तात्काळ सोडवू; असे आश्वासन दिले होते

भूषण अहिरे

धुळे : धुळे येथील प्रचार सभा आटोपल्यानंतर शिरपूर येथे आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर येत (Shirpur) शिरपूर येथील करवंदनाका येथे आदिवासी कोळी बांधवांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला. कोळी समाज बांधव अचानक ताफ्याच्या समोर आल्याने (Police) पोलिसांनी यांना अडवत ताब्यात घेतले आहे. 

लोकसभा (dhule) निवडणुकीच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. या दरम्यान (Nandurbar) नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शिरपूरमध्ये आले असताना हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न आपले सरकार आल्यावर तात्काळ सोडवू; असे आश्वासन दिले होते. मात्र १० वर्षानंतरही फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा निषेधार्थ त्यांचा काळे झेंडे दाखवून शिरपुर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. 
   

राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा करवंद नाका येथे आला असता आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर पोलिसांनी या निषेधकर्त्यांना तात्काळ बाजूला करत ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT