Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: दुचाकीची चोरी करून ऑनलाईनद्वारे विकण्याचा प्रयत्न; एकास अटक

दुचाकीची चोरी करून ऑनलाईनद्वारे विकण्याचा प्रयत्न; एकास अटक

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : दुचाकी चोरीवरच समाधान न मानता थेट ओएलएक्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तिची विक्री (Shirpur) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला शहर पोलिसांनी (Police) अटक केली. त्याच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)

वर्शी (ता. शिंदखेडा) येथील सखाराम शेनपडू भोई (वय ५२) २७ जूनला कामानिमित्त शिरपूरला आले होते. बसस्थानकासमोर असलेल्या टॅक्सी स्टँड परिसरात गौरव हॉस्पिटलसमोर त्यांनी दुचाकी लावली. अज्ञात संशयिताने तेथून दुचाकी चोरून नेली. भोई यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांना संबंधित चोरीची दुचाकी ओएलएक्स या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यांना संशयिताचा सुगावा लावला. त्याच्यावर पाळत ठेवली. सोमवारी संशयित दुचाकीची नंबरप्लेट काढून फिरत असताना चोपडा फाटा येथे त्याला ताब्यात घेतले. चेसीस व इंजिन क्रमांकावरून दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न होताच त्याला वाहनासह शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रूपेश युवराज बंजारा (वय १९, रा. अजनाड, ता. शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT