Shindkheda News Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda News: कुटुंबच झाले उध्वस्त; वडीलांसह दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू

Dhule News : कुटुंबच झाले उध्वस्त; वडीलांसह दोन मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू

Rajesh Sonwane

चिमठाणे (धुळे) : तापी नदीवर गेलेल्या वडील व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तापी नदीच्या (Tapi River) काठी गेल्यानंतर पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी (Dhule) त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. (Breaking Marathi News)

सेंधवा (मध्य प्रदेश) येथील मूळचे रहिवाशी असलेले कुटुंब नेवाडे (ता. शिंदखेडा) येथे मजुरीसाठी आले होते. आदिवासी कुटुंब चार- पाच वर्षांपासून येथेच वास्तव्यास होते. दरम्यान शुक्रवारी (८ सप्टेंबर) दुपारी शेतातील झोपडीतून नदीकाठी हरसिंग भीमसिंग देवरे (वय ३५), त्यांचा मुलगा आकाश (वय ८) व मुलगी नवसी (वय १०, सर्व रा. झोपाली, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) नदीकाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

दुसऱ्या दिवशी आढळून आले बेशुद्धावस्थेत 

शनिवारी (ता.९) ते तिघे नेवाडे येथील तापी नदीकाठावर मिळून आले. त्यांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. कुंदन वाघ यांनी त्याना मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यू्ची नोंद झाली. तिघे तापी नदीपात्राच्या किनाऱ्याला बेशुद्धावस्थेत मिळून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

धक्कादायक! खड्ड्यांमुळे रिक्षातच प्रसूती; भिवंडीत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई; खडक पोलीस स्टेशनचं तपास पथक बरखास्त, नेमकं काय आहे प्रकरण?

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; 'त्या' समाजाचे जोरदार आंदोलन, नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

SCROLL FOR NEXT