Sakri News Saam tv
महाराष्ट्र

Sakri News : पिंपळनेरकरांचा मतदानावर बहिष्कार; राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी एकमताने ठराव

Dhule news : गेल्या पाच वर्षांपासून पिंपळनेर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ७५५ जी या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित आहे.

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. झोपलेल्या प्रशासनास जागरुक करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णयावर पिंपळनेरकर ठाम असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून पिंपळनेर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ७५५ जी या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित आहे. (Dhule) रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने गेले कित्येक महिन्यांपासून या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांतर्फे वारंवार रस्ता सुधारण्याची मागणी करण्यात येत असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आले आहे. यामुळे पिंपळनेरकरांनी अखेर यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे ठरविले. 

एकमताने केला ठराव 

राष्ट्रीय महामार्ग संदर्भात वारंवार मागणी केल्यानंतर देखील प्रशासन दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आले आहे. यामुळे (Vidhan Sabha Election) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय शहरातील नागरिकांनी घेतला आहे. सर्वानी एकत्र येत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव एकमताने करीत हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 गोष्टी

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

SCROLL FOR NEXT