Bogus Doctor Saam tv
महाराष्ट्र

Bogus Doctor : चार बोगस डॉक्टर ताब्यात; साक्री तालुक्यात पोलिसांच्या कारवाईने धाबे दणाणले

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : पिंपळनेर येथील पोलिसांनी चार बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला असून, यात येथील (Dhule) गोपालनगरमधील दोन, उंभरे (ता. साक्री) येथील एक व वार्सा (ता. साक्री) येथील एकाचा समावेश आहे. त्यांच्याकडे औषधे, गोळ्या व साहित्य मिळाले. या कारवाईमुळे तालुक्यातील (Bogus Doctor) बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. (Live Marathi News)

साक्री (Sakri) तालुक्यात झालेल्या या कारवाईत राकेश प्रकाश पाटील (मूळ गाव मंहिदळे, ता. पारोळा, ह.रा. गोपाळनगर, पिंपळनेर, ता. साक्री), योगेश चंद्रकांत पाटील (मूळ रा. विरार, कल्याण, ह.मु. गोपाळनगर, पिंपळनेर), संभाजी माधवराव सोनवणे (रा. उंभरे, ता. साक्री), आशित अमूल्यरतन विसवास (मूळ रा. मध्य प्रदेश, ह.मु. वार्सा) यांना ताब्यात घेतले. (Police) पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आढावा बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाने नागरिक त्रस्त असल्याने कारवाईसाठी पोलिसांसमोर आव्हान असल्याचे व कारवाईचे आदेश दिले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४ जानेवारीला श्री. पारधी यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यातील पोलिस पथकासमवेत माग काढून छापा टाकला. यावेळी बोगस चारही डॉक्टरांना ताब्यात घेतले. वैद्यकीय समिती पथक डॉ. मनोज ठाकरे, डॉ. हितेंद्र गायकवाड, डॉ. महेंद्र शिंपी, डॉ. साहेबराव बोरसे यांच्या वैद्यकीय समिती पथकास बोगस डॉक्टर पिंपळनेर पोलिस ठाणे परिसरात वेगवेगळ्या कंपनीच्या औषध- गोळ्यांनी उपचार करीत असल्याचे आढळले. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident Video : बापरे! धावत्या कंटेनरचं चाक निघालं अन् ...; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

Pune Crime : पुण्यात महिला सुरक्षित नाहीत का? ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, पुण्यातील संतप्त घटना

Vastu Tips: घराच्या योग्य कोपऱ्यात ठेवा मनी प्लांट, संपत्तीत होईल वाढ

Prediction Of Death: कधी आणि कसा होणार मृत्यू? डॉक्टरांनी तयार केलं मृत्यूचं अचूक भाकीत करणार टूल

Marathi News Live Updates : बीडच्या माजलगावमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT