Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बनावट रासायनिक खतांचा लाखोंचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची छापे टाकत कारवाई

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निजामपूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे

भूषण अहिरे

धुळे : बनावट खतांचा साठा गोडाऊनमध्ये करून ठेवण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गोडाऊनवर छापेमारी करत कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बनावट खतांचा साथ जप्त केला आहे. 

धुळे जिल्ह्यातील साक्री (Sakri) तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निजामपूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. पोलिसांना गुप्त माहितीदारातर्फे मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर या कारवाईमध्ये पोलिसांनी एका वाहनासह चालकाला देखील ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या ठिकाणी या बनावट खतांचा साठा साठवून ठेवण्यात आलेला होता. त्या बनावट खतांच्या गोडाऊन वर देखील छापेमारी करून पोलिसांनी (Police) बनावट खतांचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे. 

२५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
पोलिसांनी धाड टाकत केलेल्या कारवाईत जवळपास पोलिसांनी २४ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देगामाल हस्तगत केला आहे. यात एका जनाला ताब्यात घेतले आहे. तसेच या कारवाई दरम्यान बनावट खत तयार करण्याच्या रॅकेटमध्ये मोठे मासे देखील गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT