Sakri News Saam tv
महाराष्ट्र

Sakri News : बकऱ्या चारण्यावरून दोन गटात वाद; पोलीस व्हॅनवरही केली दगडफेक

Dhule News : साक्री तालुक्यातील वाचखेडा या गावात शनिवारी सायंकाळी बकऱ्या चारण्याच्या कारणावर दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात वाद होऊन दगडफेक करण्यात आली.

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील वाचखेडी गावात दोन गटात संध्याकाळच्या सुमारास बकऱ्या चारण्यावरून वाद उफाळून आला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की यात दगडफेक देखील करण्यात आली. यावेळी आलेल्या पोलिसांच्या गाडीवर देखील संतप्त जमावाने दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या आहेत. 

साक्री (Sakri) तालुक्यातील वाचखेडा या गावात शनिवारी सायंकाळी बकऱ्या चारण्याच्या कारणावर दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात वाद होऊन दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती साक्री पोलिसांना मिळताच पोलीस गावात पोहचले. मात्र जमावाने (Police) पोलिसांच्या गादीवर देखील दगडफेक केली. या दरम्यान व्हॅनमध्ये बसलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी बचावले असून, पोलीस कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची ईजा पोहोचली नाही. परंतु या दगड फेकीत पोलीस व्हॅनच्या काचा मात्र फुटल्याने पोलीस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

३० जणांवर गुन्हा दाखल 

यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे, रात्री उशिरापर्यंत या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT