Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : पांझरा नदीत बुडालेल्या तरुणाचा अखेर लागला शोध; वार कुंडाणे शिवारात आढळून आला मृतदेह

Dhule news : धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धुळे शहर परिसरातून गेलेल्या पांझरा नदीला पूर आलेला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील पांजरा नदी पात्रामध्ये वार कुंडाणे शिवारात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास या तरुणाने धुळे शहरातील मोठ्या पुलावरून उडी घेतल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले होते. आज सकाळी आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.  

धुळे (Dhule) जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धुळे शहर परिसरातून गेलेल्या पांझरा नदीला (Panjhara River) पूर आलेला आहे. नदीला पूर आला असताना शहरातील मोठ्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतली होती. दरम्यान या घटनेची माहिती प्रशासनास देण्यात आल्यानंतर प्रशासनातर्फे त्याचा शोध देखील घेण्यात आला. परंतु अंधार पडल्यानंतर रात्री शोध कार्य थांबवण्यात आले होते. 

दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा या तरुणाला शोधण्यासाठी पथक नदीपात्रात गेले असता त्यांना धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वारकुंडाने शिवारात या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला आढळून आला आहे. या मृत तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नसून या संदर्भात पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT