Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंद; वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा

Dhule News : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने काही प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार (Dhule) धुळ्यात देखील संघटनेच्या दोन दिवस काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या काम बंद आंदोलनामुळे महावितरणच्या सबस्टेशन अंतर्गत कामावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (Mahavitaran) कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धुळ्यात देखील संघटनेच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा. त्याचबरोबर समान काम समान वेतन, तसेच ३० टक्के पूरक भत्ता या प्रमुख मागण्यांसह इतर आणखी मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पाचवा टप्पा असून या आंदोलनाची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली नाही; तर ५ मार्च मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे. या आंदोलनावेळी सर्व आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT