Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: राजीनामा मागे घ्या; पवारांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे आंदोलन

राजीनामा मागे घ्या; पवारांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्‍तीची घोषणा केली. या घोषणेनंतर (Dhule) धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यभरात या घोषणेचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. अनेक जिल्‍ह्यातील पदाधिकारींनी देखील आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घेवून पक्षाचे अध्‍यक्ष राहून नेतृत्‍व करावे, अशी मागणी होत आहे.

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे शरद पवार यांनी केलेली घोषणा मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. धुळ्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळ अनोख्या पद्धतीने आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेली निवृत्तीची घोषणा मागे घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

BSNL Satellite Phone : iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

SCROLL FOR NEXT