Shubhangi Patil News Saam tv
महाराष्ट्र

Mahavikas Aaghadi News: महाविकास आघाडीचा पाठींबा कुणाला?; नाशिक पदवीधर मतदार संघ, बैठकीकडे लक्ष लागून

महाविकास आघाडीचा पाठींबा कुणाला?; नाशिक पदवीधर मतदार संघ, बैठकीकडे लक्ष लागून

भूषण अहिरे

धुळे : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या सध्या सुरू असलेल्या पाठिंब्या संदर्भातील पेचाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठत ठाकरे शिवसेना (Shiv Sena) गटाचा पाठिंबा मिळविल्यानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) इतर मोठ्या दोन पक्षांकडून पाठिंबा मिळण्यासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक पार पडणार आहे. (Maharashtra News)

शुभांगी पाटील यांनी मंगळवारी शेगाव येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली. यामुळे शुभांगी पाटील यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाठिंबा दिला जाणार का? हेच या बैठकीत निश्चित होणार आहे. यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या ठाकरे शिवसेना गटाच्या पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडी आपल्यालाच पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आता बैठकीकडे लक्ष

यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. कारण या बैठकीनंतर कुठल्या उमेदवाराला महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येणार; हे निश्चित करण्यात येणार आहे. यावर नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघातील उमेदवाराचे भवितव्य देखील ठरणार आहे. त्यामुळे आजच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००?

Maharashtra News Live Update: साखरेचे दर वाढल्याने धार्मिकस्थळी प्रसाद महागणार

Manoj Jarange : मनोज जरांगेंचा इशारा, सरकार अलर्ट मोडवर; ३ कॅबिनेट मंत्री अन् १ आमदार आज अंतरवाली सराटीत

SCROLL FOR NEXT