death saam tv
महाराष्ट्र

दुर्देवी..गाडीचे काम करत असताना अचानक गाडी सरकली पुढे; चालकाचा जागीच मृत्यू

दुर्देवी..गाडीचे काम करत असताना अचानक गाडी सरकली पुढे; चालकाचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

निमगूळ (धुळे) : गाडीमध्‍ये खराबी झाल्‍याने स्‍वतःच दुरूस्‍त करावी; म्‍हणून चालक गाडीखाली शिरला. परंतु, दुर्देवाने अचानक गाडी पुढे सरकली. यामुळे खाली करत असलेल्‍या चालकाच्‍या डोक्‍यावर चाक गेले. यात त्‍याचा मृत्‍यू (Death) झाला. (dhule news While working on the car the car suddenly moved forward driver died)

चाऱ्याचे व्यापारी रविंद्र गुलाबराराव बागल यांच्यासह मुलगा पराग हे उसाच्या बांडीचा व्यवसाय करतात. रोजच्या व्यवसायात नेहमीप्रमाणे दोंडाईचा (Dondaicha) शिवारात चारा वाटप करण्यासाठी गेला असता गाडीत चारा टाकण्यासाठी गेला. दरम्‍यान 16 फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता दोंडाईचा डाबरी शिवारात टेम्‍पो मालवाहू गाडी (क्र. एमएच ११, टी ५९३) उभी करून गाडीखाली काम करत होता. यावेळी अचानक गाडी पुढे (Accident) सरकली. त्यातच त्याचा डोक्याचा भाग गाडीच्या पुढच्या चाकात येऊन जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्‍थांची धाव

घटना गावात कळल्यावर गावातील नंदलाल बागल माजी उपसरपंच दीपक बागल, जयवंतराव बागल, दीपक बागल यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. गाडी उतारावर उभी केल्याने अपघात झाल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस (Police) स्टेशनला खबर देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बागल यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. अमोल भामरे यांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास हवालदार चंद्रकांत साळुंखे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

SCROLL FOR NEXT