Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना गावठी पिस्तूलासह केले जेलबंद

गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना गावठी पिस्तूलासह केले जेलबंद

भूषण अहिरे

धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्यानजीक मोहाडी पोलिसांनी धाडसी कारवाई करत मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यासह दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी (Police) अडीच किलो गांजा, गावठी पिस्तुल काडतुसे आणि चाकुसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (dhule news Two men carrying hemp were jailed with pistols)

मोहाडी पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) लळींग टोलनाक्याजवळ हॉटेल दरियासमोर उभ्या असलेल्या जीप (क्र. एमएच 16, ७१५१) क्रमांकाच्या उघड्या जीपबाबत त्यांना संशय आला. (Dhule News) मोहाडी पोलिसांचे पथक वाहना जवळ पोहचले. त्यांनी वाहन चालक- मालक नदीम मोहम्मद शमीन सिद्दीकी आणि असलम खान अलीयार, खान पठाण या व्यापाऱ्याची चौकशी सुरु केली.

पिशवीत अडीच किलो गांजा

दोघांकडे असलेल्या पिवळ्या पिशवीची तपासणी केली असता त्यात अडीच किलो गांजा आढळून आला. तसेच दुसऱ्या पिशवीत गावठी बनावटीचे पिस्तल जीवंत काडतुसे आढळून आली. मोहाडी पोलिसांनी जीपसह 3 लाख 82 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

कल्याण जेलमध्ये थरकाप! कैद्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पायाला 16 टाके

SCROLL FOR NEXT