Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: लाखोंच्या गुटखा, पान मसाल्यासह दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

लाखोंच्या गुटखा, पान मसाल्यासह दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला (Dhule News) जवळपास २८ लाखाहून अधिकचा गुटखा व पान मसाला हस्तगत केला. या करवाईमध्ये दोघांच्या मुसक्या (Police) पोलिसांनी आवळल्या आहेत. (Live Marathi News)

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला मध्यप्रदेश येथील इंदोर येथून पुण्याच्या दिशेने धुळेमार्गे जाणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तात्काळ नरडाणा पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये सापळा रचला. यादरम्यान संबंधित गुटख्‍याने भरलेला ट्रक पोलिसांना आढळून आला.

४३ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

पोलिसांनी वाहन थांबून वाहनामध्ये (Dhule LCB) असलेल्या मालासंदर्भात विचारणा केली. मात्र ट्रक चालकातर्फे उडवाउडीचे उत्तरे देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तात्काळ ट्रक ताब्यात घेत वाहन चालक व वाहक असे दोघांना देखील ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान जवळपास पोलिसांनी ४३ लाख ६७ हजार ११८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात २८ लाख ६७ हजार ११८ रुपयाचा गुटखा व पानमासला असून जवळपास १५ लाख रुपयांचा आयशर ट्रक असा एकंदरीत मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना आक्रमक,तडजोडीला नकार – अरविंद मोरे

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

SCROLL FOR NEXT