Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : तू आवडतेस, माझ्यासोबत लग्‍न कर; तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

तू आवडेस, माझ्यासोबत लग्‍न कर; तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : दराणे (ता. शिंदखेडा) येथे २२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत (Shindkheda) मंगळवारी (११ जुलै) शिंदखेडा पोलिस (police) ठाण्यात तरुण, त्याची आई, वडील व आजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

दराणे (ता. शिंदखेडा) येथील घरकाम करणाऱ्या विवाहितेचा गावातील भय्या दिलीप ठाकरे सात- आठ दिवसांपासून शेताच्या रस्त्यावर भेटून ‘तू खूप आवडस, तुनावर मनं प्रेम से, मना संग लगीन कर!’ असे वारंवार बोलून पाठलाग करीत होता. त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करून तेथून निघून जात होते. या प्रकाराबाबत घाबरून (Dhule News) घरात पती, तसेच सासु-सासरे यांना काही सांगितले नव्हते. त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून घराबाहेर निघून कोठेही जात असताना भय्या ठाकरे जास्तच पाठलाग करीत असून, याबाबत गावात कोणास काही कळाले तर बदनामी होईल अशी भीती वाटत होती.

जाब विचारला तर शिवीगाळ करत धमकी

दरम्‍यान सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घराच्या पायऱ्यांवर बसलेले असताना पती तसेच सासू-सासऱ्यांनी भय्या ठाकरे याला जाब विचारला असता ठार करण्याची धमकी देत शिवीगाळ करून दमदाटी केली. भय्या ठाकरे, त्याची आई छोटीबाई दिलीप ठाकरे, वडील दिलीप पिरन ठाकरे व आजी सारसताबाई पिरन ठाकरे यांच्याविरोधात विनयभंग, ठार करण्याची धमकी व मारहाणीचा गुन्हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत पवार तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT