कोरोना  
महाराष्ट्र

तीन नर्सिंग विद्यार्थ्यांसह तीन वर्षांचा मुलगा कोरोना बाधीत

तीन नर्सिंग विद्यार्थ्यांसह तीन वर्षांचा मुलगा कोरोना बाधीत

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरालगत शिक्षण घेणाऱ्या तीन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह तालुक्यातील तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. काही दिवसांपूर्वीच देवपूरमध्ये २४ वर्षांची विवाहीता कोरोनाबाधित आढळली होती. ही स्थिती पाहता धुळेकरांनी सतर्क राहून कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे, असे आवाहन यंत्रणेने केले. (Dhule-news-Three-year-old-Corona-infected-with-three-nursing-students)

शहरालगत मोराणे शिवारातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम लॅबमधील पाचपैकी चार अहवाल गुरूवारी पॉजिटिव्ह आले. यात उडाणे (ता. धुळे) येथील तीन वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत हिस्ट्री जाणण्यासाठी संपर्क साधला असता आरोग्य यंत्रणेचा पालकांशी संवाद होऊ शकला नाही. तसेच मोराणे शिवारातील नर्सिंगचे तीन विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांची हिस्ट्री जाणली जात आहे. या विद्यार्थ्यांमध्ये एक वीस वर्षांचा, तर याच वयोगटातील दोन तरूणींचा समावेश आहे. या चौघांमुळे जिल्ह्याची दोन वर्षांतील बाधितांची एकूण संख्या ४५ हजार ८७९ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले 130 मोबाईल मालकांच्या हाती

Maharashtra News Live Update: डी. वाय पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

SCROLL FOR NEXT