Bogus Doctor Saam tv
महाराष्ट्र

Bogus Doctor : दहावी नापास बनला डॉक्टर; धुळ्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांनी तीन ठिकाणी टाकले छापे

Dhule News : धुळे जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कंबर कसली

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात मागील आठवड्यात चार बोगस डॉक्टराना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर आज आणखी (Dhule) तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी तीन बोगस डॉक्टरांना (Bogus Doctor) ताब्यात घेतले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे दहावी नापास व्यक्ती डॉक्टर बनून उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. (Tajya Batmya)

धुळे जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कंबर कसली असून, गेल्या आठवड्यात देखील या संदर्भात कारवायांचा धडाका पोलीस (Police) प्रशासनातर्फे सुरू होता आणि पुन्हा एकदा जिल्हाभरातील तीन बोगस डॉक्टरां संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून तीन बोगस डॉक्टरांना ताब्यात घेतले. यापूर्वी देखील सात बोगस डॉक्टरांना पोलिसांनी छापेमारी करून ताब्यात घेतले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वच आजारांवर बोगसपणे इलाज 

एक बोगस डॉक्टर दहावी नापास असल्याचे देखील उघडकीस आले आहे. तर ज्या विषयाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, अशा देखील आजारांवर या बोगस डॉक्टरांतर्फे बोगसपणे ईलाज सुरू असल्याचे देखील या कारवाईदरम्यान उघडकीस आले आहे. या सर्व बोगस डॉक्टरां विरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस प्रशासनातर्फे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार? आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

Government Scheme : तिसरं अपत्य झाल्यास सरकार देणार २५,००० रुपये; या राज्याने घेतला निर्णय, वाचा नेमकी योजना काय आहे?

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

जसप्रीत बुमराहचं नाव नाही, विश्वचषकातील सर्वोत्तम ८ खेळाडूंची नावं जाहीर, वाचा ICC च्या यादीत कोण कोण?

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घेतली प्रॉपर्टी; राम मंदिराजवळील कोट्यवधींची जमीन केली खरेदी

SCROLL FOR NEXT