Dhule Saam tv
महाराष्ट्र

हृदय पिळवटून टाकणारी घटना..मुलीच्‍या हक्‍कासाठी उपोषणादरम्यान पित्‍याने सोडले प्राण

हृदय पिळवटून टाकणारी घटना..मुलीच्‍या हक्‍कासाठी उपोषणादरम्यान पित्‍याने सोडले प्राण

भूषण अहिरे

धुळे : हृदय पिळवटून टाकणारी घटना धुळ्यात घडली आहे. मुलीच्या न्याय हक्कासाठी ७१ वर्षीय वयोवृद्ध वडिलांनी प्रशासनाकडून न्याय मिळेल; या आशेवर उपोषणादरम्यान आपला प्राण सोडला. ७१ वर्षीय सुदन्वा भदाने या वृद्ध पित्याने मृत्यूपूर्वी उपोषणादरम्यान हे स्पष्ट देखील केले होते, की जर प्रशासनातर्फे माझ्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केले; तर मी उपोषणादरम्यानच आपला देह सोडेल, असे उपोषण सुरू असताना या वृद्ध पित्याने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्याप्रमाणेच त्यांनी उपोषणादरम्यान आपला देह सोडला. (dhule news The death of the father during the fast for the rights of the girl child)

सुदन्वा भदाणे (वय 71) व त्यांच्या धर्मपत्नी रंजना भदाणे (वय 65) हे वृद्ध दाम्पत्य 14 मार्चपासून प्रशासनाच्या विरोधात उपोषणासाठी धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बसले होते. लग्न (Marriage) होऊन त्यांच्या मुलीला तिच्या पतीकडून होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी सुरू असलेल्या या उपोषणा दरम्यान तिसऱ्या दिवशी वयोवृद्ध पित्याची प्रकृती ढासळली. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. व उपचारादरम्यान याविरुद्ध पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे कालच या वृद्ध पित्याचा एकात्तरावा वाढदिवस देखील होता. परंतु आपल्या जन्म दिवशीच मुलीच्या न्याय हक्कासाठी या पित्याने देह सोडल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतदेह ताब्‍यात घेण्यास नकार

मुलीच्या न्याय हक्कासाठी देह ठेवणाऱ्या वृद्ध पित्याला मृत्यूनंतर तरी न्याय मिळेल का, याकडेच संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जोपर्यंत या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर प्रशासनातर्फे कठोरात कठोर कारवाई करण्यात येत नाही; तोपर्यंत उपोषणादरम्यान मृत पावलेल्या सुदन्वा भदाने यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

Sanjay Raut: खासदार संजय राऊतांचे FDA अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप; थेट तुकाराम मुंढेंना पत्र धाडलं

SCROLL FOR NEXT