Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा बालकांना चावा; उपचारासाठी दाखल

पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा बालकांना चावा; उपचारासाठी दाखल

साम टिव्ही ब्युरो

धुळे : मोहाडी उपनगर येथे रविवारी (ता. १५) पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडल्याचे समोर आले. या कुत्र्याने रविवारी सायंकाळी पाच ते सहादरम्यान मोहाडी येथील तब्बल आठ ते दहा लहान मुलांना चावा घेत जखमी केले. या सर्व बालकांना उपचारासाठी श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल केले. दरम्यान, यातील एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. (Latest Marathi News)

शहरात अनेक वर्षांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मनपातील सत्ताधारी, विरोधकांसह नागरिकांनी घसा कोरडा करूनही महापालिकेकडून उपाययोजना झाल्या नाहीत. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे कामही अद्याप प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे संक्रांतीच्या दिवशी मोहाडी उपनगर येथील लहान मुलांवरच संक्रांत आल्याचे पाहायला मिळाले.

मोहाडी येथील जयशंकर कॉलनी, वर्षावाडी, पिंपळादेवीनगर, वरचे गाव, खालचे गाव, संजयभाऊनगर, वालचंदनगर आदी भागातील तीन ते १२ वर्षे वयोगटातील बालकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्यामागे काही नागरिक लागल्याने संबंधित कुत्रा पळत सुटला व वाटेत जी मुले सापडली त्यांना तो चावत सुटल्याची माहिती मिळाली.

यात आठ ते दहा बालकांना कुत्र्याने चावा घेत जखमी केले. यात तेजस शरद बोरसे (वय ११), भावेश भटू ठाकूर (३), मनरूप फौर (३), सात्त्विक रवींद्र गावडे (वय १०), प्रथमेश दिगंबर पारधी (१२), अमन खाटीक (३), उत्कर्ष वाघ (९), शाहू कसबे (५) या मुलांचा समावेश आहे. या सर्व मुलांना तातडीने हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT