Suicide case 
महाराष्ट्र

भाजी विक्रेत्‍याची आत्‍महत्‍या; खिशात सापडली चिठ्ठी

भाजी विक्रेत्‍याची आत्‍महत्‍या; खिशात सापडली चिठ्ठी

साम टिव्ही ब्युरो

न्याहळोद (धुळे) : लसूण, भाजीपाला विक्रेते कैलास बाबूलाल खैरनार (वय ५१) यांनी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी उघळकीस आली. (dhule-news-suicide-of-a-vegetable-seller-A-note-found-in-his-pocket)

न्याहळोद धुळे कापडणे रस्त्यालगत अंजनाबाई महाजन यांच्या शेताच्या बांधावर भोकरच्या झाडाला गाडा बैलच्या जोतच्या साह्याने गळ्याला दोर बांधून आत्महत्या केल्‍याचे आज उघडकीस आले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. काही दिवसापासून त्यांना आर्थिक विवंचनेची अडचण भासत होती. असे ग्रामस्थांमध्‍ये बोलले जात आहे. घटनास्थळी सोनगीर बीट हवलदार विजय पाटील यांनी पंचनामा केला असून शवविच्‍छेदनासाठी मृतदेह रवाना करून पुढील तपास करीत आहेत. त्यांची अंत्ययात्रा न्याहळोद येथील पांझरा नदीपात्रात करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. ते बाबूलाल खैरनार यांचे पुत्र तर ज्ञानेश्वर खैरनार यांचे वडील होत.

चिठ्ठीत असा आहे उल्‍लेख

कैलास खैरनार यांचा मृतदेह खाली उतरवताना खिशातून चिठ्ठी निघाली. त्यात उल्लेख केला असून माझा आत्महत्येच्यामागे मुलाचा, सून, मुलीचा, आई- वडिलांचा व पत्नीचा कोणाचाही दोष नाही. मी माझ्या इच्‍छेनुसार मरत असल्‍याचा उल्‍लेख करत खाली आपलाच कैलास खैरनार अशी सही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT