Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : बस चालकांच्या हलगर्जीपणामुळे शैक्षणिक नुकसान; विद्यार्थ्यांचे एसटी प्रशासनाविरोधात आंदोलन

Dhule News : एसटी प्रशासनातर्फे संबंधित ठिकाणी थांबा जाहीर केलेला आहे. असे असताना देखील एसटी बस चालकांनी संबंधित ठिकाणी बस न थांबवल्याने विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजेपासून साडेनऊ वाजेपर्यंत थांबावे लागले.

भूषण अहिरे

धुळे : दोंडाईचा- चिमठाणा रस्त्यावर सावर्दे फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसथांबा असताना देखील नंदुरबारकडून येणाऱ्या बस थांबविल्या जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जात येत नाही किंवा उशिराने पोहचत (Dhule) असतात. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाविरोधात आंदोलन केले. (Live Marathi News)

एसटी प्रशासनातर्फे (St Bus) संबंधित ठिकाणी थांबा जाहीर केलेला आहे. असे असताना देखील एसटी बस चालकांनी संबंधित ठिकाणी बस न थांबवल्याने विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजेपासून साडेनऊ वाजेपर्यंत थांबावे लागले. (Student) विद्यार्थ्यांना बस उपलब्ध न झाल्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचता आले नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना परीक्षेला उशिरा पोहोचल्यामुळे पेपर देता आला नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बस चालकांकडून दररोज होत असलेल्या मनमानी सुरु असते. दरम्यान आज या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत एसटी डेपोमध्ये एसटी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे. दिलेल्या थांब्यावर बस थांबवावी याबाबत मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT