Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मनसेचा रास्ता रोको; मनपा विरोधात आंदोलन

Dhule News : नागरिकांना या रस्त्यांमधून जीवघेणा प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

भूषण अहिरे

धुळे : सध्या पावसामुळे धुळे शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे. रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे महापालिका प्रशासनाविरोधात मनसेच्यावतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.    

धुळे (Dhule) शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. बहुतांश रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना या रस्त्यांमधून जीवघेणा प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे तर रस्त्याची अधिकच बिकट अवस्था झाली आहे. या संदर्भात धुळ्यात मनसे (MNS) आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले असून, धुळे शहरातील नकाने रोड परिसरामध्ये मनसेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. 

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
धुळे महापालिका (Dhule Corporation) प्रशासनाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून आंदोलक मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळाले आहे.  मनसेतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग असल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT