Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मंदिरातील दानपेट्यांची चोरी; मध्यप्रदेशमधून दोघे ताब्‍यात

मंदिरातील दानपेट्यांची चोरी; मध्यप्रदेशमधून दोघे ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : जिल्‍ह्यातील बोरीस गावातील मंदिरांमधील दानपेट्या चोरी झाल्‍या होत्‍या. याचा तपास पोलिसांकडून (Police) सुरू होता. या दरम्‍यान मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मध्यप्रदेशमधून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule) पथकाने अटक केली आहे. (Breaking Marathi News)

धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या बोरीस या गावातील मंदिरातून दानपेट्या चोरी गेल्याची घटना गेल्या ४ जुलैला उघडकीस आली होती. यामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांच्या हालचाली देखील कैद झाल्या होत्या. या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे सोनगीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता.

पाच हजाराची रोकड हस्‍तगत

पोलिसांच्‍या तपासादरम्‍यान मध्य प्रदेशमधील बडवानी येथील दोघा तरुणांनी ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या ठिकाणी पोहोचून या दोघेही चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या दानपेठ्यासह पाच हजारांची रोकड हस्तगत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT