Tobacco 
महाराष्ट्र

लाखो रुपयांचा गुटखा जप्त; दोघांना घेतले ताब्‍यात

लाखो रुपयांचा गुटखा जप्त; दोघांना घेतले ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : राज्यामध्ये बंदी असलेल्या केसरयुक्त सुगंधी पानमसाला व तंबाखू अवैधरित्या दोंडाईचाकडून धुळ्याकडे वाहून नेला जात होता. याबाबतची गुप्त माहितीद्वारे सोनगीर पोलीसांनी कारवाई करत लाखो रूपयांचा गुटखा जप्‍त करत दोघांना ताब्‍यात घेतले. (dhule-news-songir-police-seized-tobacco-and-Both-were-taken-into-custody)

गुटखा विक्रीस बंदी असताना सर्रासपणे गुटख्‍याची वाहतूक केली जाते. अशाच प्रकारे सुगंधी पानमसाला व तंबाखू अवैधरित्‍या वाहतूक केली जात होती. याबाबत सोनगिर पोलिस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनगीर टोलनाक्याजवळ सापळा रचला असता माहिती मिळालेला आयसर ट्रक संबंधित पोलीसांना आढळून आला. या ट्रकला तात्काळ अडवून त्यामध्ये बसलेल्या दोघांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी ट्रक पोलिस ठाण्याला आणल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यात केसरयुक्त सुगंधी पानमसाला व तंबाखूचा ४८ पोते आढळून आले आहेत.

३८ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सोनगीर पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत तब्बल ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाई दरम्यान दोघांच्या सोनगीर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

Maharashtra Live News Update : नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस

Bollywood Divorce: बॉलीवूडमधील सगळ्यात महागडे घटस्फोट, पोटगी जाणून व्हाल थक्क

GK: सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? जाणून घ्या

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

SCROLL FOR NEXT