Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: गोंडगावच्या घटनेच्या निषेधार्थ शिंदखेड्यात मूकमोर्चा; आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

गोंडगावच्या अल्पवयीन बालिका अत्याचार प्रकरण; दोंडाईचा येथे मूकमोर्चा काढत आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी

भूषण अहिरे

धुळे : जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारल्याची (Dhule) घटना घडली आहे. सदर घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; यासह अन्य मागण्यासाठी विविध संघटनांतर्फे शिंदखेडा (Shindkheda) येथे मूकमोर्चा काढण्यात आला. (Tajya Batmya)

काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालूक्यातील बालिकेवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळ्याच्या शिंदखेडा येथे देखील विविध राजकीय योगा सामाजिक संघटनांनी एकत्र येत हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच सरकारी वकील उज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात येऊन या घटनेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी; या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. 

काळ्या फित लावून घोषणाबाजी 
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व मोर्चेकरांनी काळ्याफिती लावून आपला सहभाग या मोर्चामध्ये नोंदवला असून यावेळी आरोपीच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

SCROLL FOR NEXT