Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : मुख्यमंत्री धुळेकरांना देणार नवीन वर्षाची भेट; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

Dhule News : धुळेकर नागरिकांची वाढीव घरपट्टीतून सुटका होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे धुळ्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले आहे.

Rajesh Sonwane


धुळे : धुळे शहरातील घरपट्टी वाढीचा निर्णय महापालिकेचा महासभेत घेण्यात आला होता. याबाबत (Dhule) शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान वाढीव घरपट्टीतून सुटका करून मुख्यमंत्री धुळेकरांना नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Breaking Marathi News)

गेल्या काही महिन्यापासून लादलेल्या कराची पठाणी वसुलीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या गंभीर अडचणीत धुळेकर नागरिकांच्या पाठीशी शिवसेना (Shiv Sena) खंबीरपणे उभी असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला आदेश केले असून २ जानेवारीला मंत्रालयात यासंदर्भात बैठक असून नागरिकांवर (Dhule Corporation) मनपाने लादलेल्या या पठाणी वसुलीतून सुटका करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन 

धुळेकर नागरिकांची वाढीव घरपट्टीतून सुटका होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे धुळ्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेने लादलेली वाढीव घरपट्टी भरू नये; असे थेट आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी धुळेकरांना जाहीर प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT